ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
“धाराशिव २.०”फेक एक्झिट पोलवर भाजपचा बचाव का?- रवी वाघमारेंचा घणाघाती सवाल

0
6
7
8
4
1
“धाराशिव २.०”फेक एक्झिट पोलवर भाजपचा बचाव का?- रवी वाघमारेंचा घणाघाती सवाल
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
आम्ही “धाराशिव २.०”या फेक सोशल मीडिया पेजवर कायदेशीर कारवाईची मागणी करत असताना त्या पेजच्या ॲडमिनच्या बचावासाठी भाजपचे लोक पुढे येत असतील, तर यामागे नेमकं कारण काय? आणि टीआरपी वाढवायचीच असेल, तर ते काय ओमराजे निंबाळकर आहेत का? असा खोचक सवाल करत युवासेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
फेक एक्झिट पोल प्रकरणी ठाकरे गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर टीका करत,विरोधक टीआरपीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव घेत आहेत,असा आरोप केला होता.या आरोपांचा समाचार घेताना वाघमारे यांनी भाजपचा “दुटप्पी चेहरा”उघड केला.
▪️फेक पेजवर बोललो तर भाजपला मिरच्या का झोंबल्या?
दि.१३ डिसेंबर रोजी आम्ही पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. मात्र, हे प्रकरण समोर येताच भाजपकडून छुप्या पद्धतीने बचाव करण्याचे प्रयत्न सुरू झाले.”धाराशिव २.०”आणि भाजपचा नेमका काय संबंध आहे? आम्ही त्या फेक पेजवर बोट ठेवलं म्हणून भाजपला एवढ्या मिरच्या का झोंबल्या? असा थेट सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला.
▪️आमच्याकडे “ओमराजे” ब्रँड असताना प्रसिद्धीसाठी इतरांची गरज काय?
भाजपने केलेल्या टीआरपीच्या आरोपावर टोला लगावत वाघमारे म्हणाले,टीआरपीसाठी आम्ही दुसऱ्यांची नावं घेतो, असा आरोप केला जातो. पण आमच्याकडे ओमराजे निंबाळकर यांच्यासारखं जनतेत वलय असलेलं नेतृत्व असताना आम्हाला प्रसिद्धीसाठी इतरांची नावं घेण्याची गरजच काय? मुळात ज्यांनी फेक आणि दिशाभूल करणारे व्हिडीओ तयार केले,त्यांना जाऊन विचारा की तुमच्यावर ही नामुष्की का आली?
▪️फेक व्हिडीओ हा भाजपचा रडका डाव
भाजपवर हल्ला चढवत वाघमारे पुढे म्हणाले,समोरासमोर राजकीय लढा देण्याची ताकद भाजपकडे नाही. म्हणूनच फेक व्हिडीओ, बनावट एक्झिट पोल आणि दिशाभूल करणारे प्रकार करून रडका डाव खेळावा लागत आहे. अशा प्रकारातून भाजपने नेमकं काय साध्य केलं,याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं,असे आव्हानही त्यांनी दिले.
फेक एक्झिट पोल आणि “धाराशिव २.०”प्रकरणानंतर धाराशिवच्या राजकारणात भाजप आणि ठाकरे गटातील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
0
6
7
8
4
1



