Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

संदीप बचाटे आरळी बुद्रुक गावचा पहिला फौजदार !जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याचा संघर्षमय यशस्वी प्रवास

0 7 6 5 1 9

संदीप बचाटे आरळी बुद्रुक गावचा पहिला फौजदार !जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याचा संघर्षमय यशस्वी प्रवास

तुळजापूर – तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील तरुण संदीप विरनाथ बचाटे यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस प्रशासन सेवेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे सत्र क्रमांक 126 अंतर्गत उपनिरीक्षक (PSI) पदाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून सेवेत दाखल झाले आहेत.आरळी बुद्रुक या ग्रामीण भागातून प्रथमच फौजदार घडल्याने ही बाब संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद ठरली आहे. संदीप बचाटे यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यश नसून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी तो प्रेरणादायी आदर्श आहे.संदीप यांनी जिल्हा परिषद प्रशाला, आरळी बुद्रुक येथून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बारावीचे शिक्षण सोलापूर येथे घेतले, तर पदवीचे शिक्षण अणदूर येथे पूर्ण केले. ग्रामीण भागातील साध्या शैक्षणिक प्रवासातून त्यांनी मोठ्या प्रशासकीय सेवेपर्यंत मजल मारली. उच्च शिक्षणानंतर संदीप यांनी पुणे येथे सलग चार वर्षे निवासी राहून एमपीएससी परीक्षेची तयारी केली. या सातत्यपूर्ण प्रयत्नातून त्यांनी एमपीएससी संयुक्त गट–ब परीक्षा 2021 च्या जाहिरातीनुसार परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.यानंतर नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत त्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण झाले. शिस्त, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांवर आधारित हे प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. नाशिक येथे पार पडलेल्या दीक्षा समारंभाला संदीप यांचे वडील विरनाथ बचाटे, भाऊ नागनाथ बचाटे, वहिनी मिनाक्षी सुधाकर बचाटे तसेच संस्कृती नागनाथ बचाटे उपस्थित होते. आई जगदेवी बचाटे यांनी आपल्या मुलाच्या यशामुळे कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना व्यक्त केली.संदीप बचाटे यांच्या या यशामुळे आरळी बुद्रुक गावासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी नवी दिशा व प्रेरणा मिळत आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे