Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद

0 8 5 6 2 0

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद

धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई करत गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह एका आरोपीस जेरबंद केले आहे. ही कारवाई दि. १२ जून २०२६ रोजी करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी पथक पेट्रोलिंग करीत होते.येरमाळा येथील चौकात असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, शाम शिवाजी काळे हा आंदोरा येथे पंचायतसाठी आला असून तो आंदोरा येथील हॉटेल निसर्गसमोर थांबलेला आहे. त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने वरिष्ठांना माहिती देऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली.हॉटेल निसर्गसमोर संशयित इसम उभा असल्याचे निदर्शनास येताच पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने आपले नाव शाम शिवाजी काळे (वय ३२), रा. झगडे गल्ली, भूम, ता. भूम, जि. धाराशिव असे सांगितले.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला खोवलेला लाकडी पिस्टल ग्रीप असलेला लोखंडी गावठी कट्टा तसेच पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे कळंब येथे अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्याला कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर तसेच चापोअं. रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे