ब्रेकिंगमहाराष्ट्र
मारहाणीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; एकावर गुन्हा
मारहाणीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; एकावर गुन्हा

0
7
6
5
2
2
मारहाणीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; एकावर गुन्हा
भुम : भुम तालुक्यातील उळुप येथील एका व्यक्तीने मारहाणीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुम पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, मयत नामे-रणजीत सर्जेराव सानप (वय 42, रा. उळुप ता. भुम जि. धाराशिव) यांनी दि.11.03.2026 रोजी सायं. 18.58 वा. ते दि.12.03.2026 रोजी 13.28 वा. पूर्वी रामेश्वर येथे व बह्राणपुर शिवारातील चौघुले यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
आरोपी नामे-औदुंबर उर्फ पिनु विष्णु दराडे (रा. रामेश्वर ता. भुम जि. धाराशिव) यांनी उसतोडीचे उचल घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून मयत रणजीत सानप यांना रामेश्वर येथे बसवून ठेवून मारहाण केली. दिलेल्या त्रासाला कंटाळून रणजीत सानप यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.याप्रकरणी फिर्यादी नामे-तानाजी पंडीत सानप (वय 19, रा. उळुप ता. भुम जि. धाराशिव) यांनी दि.12.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भुम पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 108, 127(2), 115(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

0
7
6
5
2
2



