Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर विधिज्ञ संघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर ;१७ जानेवारी रोजी मतदान व मतमोजणी

0 7 6 5 2 3

तुळजापूर विधिज्ञ संघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर ;१७ जानेवारी रोजी मतदान व मतमोजणी

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर विधिज्ञ संघाच्या सन २०२६–२७ या कार्यकाळासाठी होणाऱ्या पदाधिकारी निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत राबविण्याचे नियोजन दि.२ जानेवारी रोजी झालेल्या बैठकी नुसार दि.०७ जानेवारी २०२६ रोजी मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे.त्यानंतर दि.८ व ९ जानेवारी २०२६ रोजी उमेदवार अर्ज दाखल करता येणार असून, दाखल अर्जांची छाननी दि. १२ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.इच्छुक उमेदवारांना दि. १३ जानेवारी २०२६ रोजी अर्ज माघारी घेण्याची संधी देण्यात आली आहे.अखेर दि. १७ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया व त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष (महिला – राखीव), सचिव, सहसचिव व कोषाध्यक्ष ही प्रमुख पदे भरली जाणार आहेत.निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी : अ‍ॅड. तानाजी जगताप,सहाय्यक निवडणूक अधिकारी : अ‍ॅड. संजय कापसे ,मतदान केंद्र अध्यक्ष : अ‍ॅड. बाळाजी देशमाने,मतगणना प्रमुख : अ‍ॅड. सुजीत गायकवाड मतगणना सहाय्यक : अ‍ॅड. महेंद्र हंगरगेकर,तुळजापूर न्यायालय परिसरातील विधिज्ञ संघाच्या लोकशाही परंपरेनुसार ही निवडणूक शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, सर्व सभासदांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे