ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
राष्ट्रवादीचा दमदार जंगी शो! मंजुषा साखरे यांचा अर्ज पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल
राष्ट्रवादीकडून महिलांना मोठी संधी; मंजुषा साखरे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात
0
7
6
5
1
6
राष्ट्रवादीचा दमदार जंगी शो! मंजुषा साखरे यांचा अर्ज पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आज मोठी हालचाल पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अखेर आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करत ॲड मंजुषा विशाल साखरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ॲड साखरे यांनी दमदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्यासाठी झालेल्या या शक्तिप्रदर्शनात जिल्हाध्यक्ष महेंद्र धूरगुडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, शहराध्यक्ष सचिन तावडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, जिल्हा प्रवक्ता ॲड. विशाल साखरे, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जाधव, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अराफत काझी यांच्यासह अनेक मान्यवरांनी ॲड मंजुषा साखरे यांना शुभेच्छा दिल्या.

अर्ज दाखल करताना साखरे यांनी शहरातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.धाराशिवमध्ये नगराध्यक्ष पदाची लढत रंगतदार होत असताना राष्ट्रवादीच्या या अधिकृत घोषणेमुळे राजकीय वातावरणात नवचैतन्य संचारले आहे.
0
7
6
5
1
6



