Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

उज्जैनच्या महामंडलेश्वरांकडून श्री तुळजाभवानी मातेची ओटीभरण पूजा; स्वराज अमरराजे कदम यांनी केले पौरोहित्य

0 7 6 4 9 7

उज्जैनच्या महामंडलेश्वरांकडून श्री तुळजाभवानी मातेची ओटीभरण पूजा; स्वराज अमरराजे कदम यांनी केले पौरोहित्य

तुळजापूर : मध्यप्रदेशातील उज्जैन नगरीतील श्री मौनतीर्थ पिठाधीश्वर, अनंतश्री विभूषित ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी डॉ. सुमनानंद गिरिजी महाराज यांनी मंगळवारी सायंकाळी तुळजापूर येथे येत श्री तुळजाभवानी मातेची ओटीभरण पूजा करून दर्शन घेतले.
महाराष्ट्राच्या कुलदैवताचे दर्शन घेताच मन अतिशय प्रसन्न झाल्याचे समाधान स्वामीजींनी व्यक्त केले.

स्वामी डॉ. सुमनानंद गिरिजी महाराज यांच्या हस्ते पार पडलेल्या ओटीभरण पूजेचे पौरोहित्य मंदिरातील मुख्य भोपे पुजारी स्वराज अमरराजे कदम यांनी विधिवतरीत्या केले. पूजेच्या वेळी मंदिर परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

याप्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे धार्मिक व्यवस्थापक अमोलजी भोसले तसेच भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी स्वामीजींचा यथोचित सत्कार केला. देवीची प्रतिमा आणि प्रसाद देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात उज्जैनसारख्या नामांकित पीठाचे प्रमुख स्वामी डॉ. सुमनानंद गिरिजी महाराज यांनी दर्शन घेतल्याने या भेटीचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले असल्याचे भाविकांनी सांगितले. स्वामीजींसमवेत अनेक भाविक, मान्यवर उपस्थित होते.
स्वामीजींच्या आगमनाने मंदिर परिसरात उत्साहाचे आणि आध्यात्मिकतेचे वातावरण पसरले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे