Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘स्वच्छ पाण्यासाठी झटणाऱ्या हातांना सलाम’; पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना रेनकोट भेट

"वाढदिवस साजरा सेवाभावी कार्याने... स्वच्छ पाण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सागर कदम कायम उभे!"

0 8 5 6 2 0

‘स्वच्छ पाण्यासाठी झटणाऱ्या हातांना सलाम’; पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना रेनकोट भेट

वाढदिवसानिमित्त सभापती सागर कदम यांचा उपक्रम; ३० कर्मचाऱ्यांचा केला सन्मान

“वाढदिवस साजरा सेवाभावी कार्याने… स्वच्छ पाण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सागर कदम कायम उभे!”

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

शहरातील नागरिकांना दररोज पहाटेपासून स्वच्छ व निर्जंतुकीकृत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पाऊस, ऊन आणि प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र कार्यरत असलेल्या नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने पाणीपुरवठा सभापती सागर कदम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ३० कर्मचाऱ्यांना रेनकोट भेट देत त्यांचा गौरव केला.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद गंगणे, गटनेते औदुंबर कदम, विशाल रोचकरी, नरेश अमृतराव, आबा कंदले, सुनील रोचकरी, मधुकर शेळके, रत्नदीप भोसले, आनंद सावंत, लखन पेंदे, अण्णाभाई क्षीरसागर, अजित परमेश्वर तसेच पाणीपुरवठा प्रमुख महादेव शिंदे, धनु जगदाळे, एखंडे आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सुरक्षिततेसाठी रेनकोटचे वाटप करण्यात आले. वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे