Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तायक्वांदो मैदानात ग्रीन सिटी स्कूलची दमदार कामगिरी!

यशश्री, वैष्णवीच्या गळ्यात सुवर्णपदक; आदित्य कदम, मेघराज माने-देशमुख यांनी पटकावली रौप्यपदके

0 8 5 6 2 0

तायक्वांदो मैदानात ग्रीन सिटी स्कूलची दमदार कामगिरी!

यशश्री, वैष्णवीच्या गळ्यात सुवर्णपदक; आदित्य कदम, मेघराज माने-देशमुख यांनी पटकावली रौप्यपदके

अकलूज : तुळजापूरनामा

सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून पिलेव येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय तायक्वांदो स्पर्धेत संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्रीन सिटी इंग्लिश मीडियम स्कूल, वेळापूरच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.

या स्पर्धेत यशश्री भगत हिने २२ ते २४ किलो वजन गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. तसेच वैष्णवी भगत हिने २६ ते २९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

दरम्यान, आदित्य कदम याने ३२ ते ३५ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक, तर मेघराज माने-देशमुख यानेही उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गिरमे (रंजन भाऊ), सचिव व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका प्रतीक्षा भडके तसेच मुख्य क्रीडा प्रशिक्षक उद्धव जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी तालुका क्रीडा अधिकारी रणजीत लोहार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे ग्रीन सिटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे