ब्रेकिंगमहाराष्ट्र
राजमाता जिजाऊंचे १६ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव परिवारासहकुटुंबाने घेतले तुळजाभवानीचे दर्शन
कुलदेवीची साडी-चोळीची ओटी भरून घेतला आशीर्वाद; ‘इतिहास आणि संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे कर्तव्य’

0
8
5
6
2
6
राजमाता जिजाऊंचे १६ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव परिवारासहकुटुंबाने घेतले तुळजाभवानीचे दर्शन
कुलदेवीची साडी-चोळीची ओटी भरून घेतला आशीर्वाद; ‘इतिहास आणि संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे कर्तव्य’
तुळजापूर : प्रतिनिधी
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १६ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या कुटुंबीयांसह तुळजापूर येथे येऊन कुलदेवी श्री तुळजाभवानी मातेचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले.

श्री तुळजाभवानी मंदिरात सपरिवार दर्शन घेतल्यानंतर जाधवराव यांनी देवीची साडी-चोळीची ओटी भरून मातेचा आशीर्वाद घेतला. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले तसेच नगरसेवक मधूकर शेळके यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांचे पौरोहित्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केले.

दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राजे अमरसिंह जाधवराव यांनी तुळजाभवानी मातेप्रती असलेली श्रद्धा व्यक्त केली. “तुळजाभवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि आमची कुलदेवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांना याच देवीने स्वराज्य स्थापनेची प्रेरणा आणि शक्ती दिली,” असे त्यांनी सांगितले.

तुळजाभवानी मातेच्या पवित्र भूमीत सपरिवार दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याचा मनस्वी आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच समाजातील सलोखा, शांतता आणि समृद्धीसाठी मातेच्या चरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

“आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे,” असे मतही जाधवराव यांनी व्यक्त केले.

यावेळी जाधवराव परिवारातील सदस्य, मंदिरातील भोपे पुजारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. जिजामाता तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष सुजय शेळके, नाना कदम, स्वराज कदम, महेश शिंदे, राहुल जाधव, बालाजी तट, दशरथ तट यांचीही उपस्थिती होती.
0
8
5
6
2
6



