Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नाना पटोले सहकुटुंब आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक

‘शेतकरी राजा सुखी राहू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे’; आई तुळजाभवानीला घातले साकडे

0 8 5 6 2 0

नाना पटोले सहकुटुंब आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक

‘शेतकरी राजा सुखी राहू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे’; आई तुळजाभवानीला घातले साकडे

तुळजापूर : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचे आमदार तथा माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहकुटुंब महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधिवत पूजा करून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धीसाठी मातेच्या चरणी साकडे घातले.

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर नाना पटोले यांनी “शेतकरी राजा सुखी राहू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे,” अशी प्रार्थना आई तुळजाभवानीच्या चरणी केली. राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटे दूर होऊन त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नाना पटोले यांच्या तुळजापूर आगमनानिमित्त काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. दर्शनावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड,धीरज पाटील, नगर परिषद गटनेते अमोल कुतवळ, नगरसेवक रणजित इंगळे,नगरसेवक आनंद जगताप, तालुकाध्यक्ष अरविंद बेडगे, हरीश चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रार्थनेची यावेळी विशेष चर्चा झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे