Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नळदुर्ग नगरपालिका कर्मचारी मारहाण प्रकरणातील दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

नळदुर्ग नगरपालिका कर्मचारी मारहाण प्रकरणातील दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

0 8 5 6 2 0

नळदुर्ग नगरपालिका कर्मचारी मारहाण प्रकरणातील दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

नळदुर्ग नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मण बंडगर व सुनिता बंडगर यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

फिर्यादीनुसार, 19 जुलै 2022 रोजी सकाळच्या सुमारास नळदुर्ग नगरपालिकेचे कर्मचारी नळदुर्ग येथील दुर्गानगर परिसरात रस्ता व गटाराच्या कामानिमित्त गेले होते. त्यावेळी या कामावरून झालेल्या वादातून आरोपींनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 341, 504 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने पाच ते सहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासले. विशेष म्हणजे, कोणताही साक्षीदार फितूर झाला नव्हता. मात्र, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, पुराव्यातील त्रुटी आणि इतर कायदेशीर बाबींचा विचार करून सत्र न्यायालयाने सरकारी पक्ष आरोपींविरुद्ध आरोप शंकातीतपणे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करत दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ऍड एम. बी. माढेकर यांनी बाजू मांडली. त्यांना ऍड धर्मराज सरडे, ऍड विशाल बारकुल, ऍड संकेत भोसले, ऍड स्वप्नील बोबडे, ऍड विश्वजीत मोटे आणि ऍड दिग्विजय वारे यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे