ब्रेकिंगमहाराष्ट्र
सोयाबीनचा उतारा घटला; अर्ध्या गुंठ्यात दोन किलोपेक्षाही कमी उत्पादन!
तामलवाडीतील पीक कापणी प्रयोगातून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

0
8
5
6
2
6
सोयाबीनचा उतारा घटला; अर्ध्या गुंठ्यात दोन किलोपेक्षाही कमी उत्पादन!
तामलवाडीतील पीक कापणी प्रयोगातून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
तामलवाडी : तुळजापूर नामा
यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याचे तामलवाडी येथे झालेल्या पीक कापणी प्रयोगातून समोर आले. शेतकरी शंभू भागवत गवळी यांच्या शेतात करण्यात आलेल्या प्रयोगात अर्ध्या गुंठ्यात दोन किलोपेक्षाही कमी सोयाबीनचे वजन नोंदविण्यात आले. त्यामुळे उत्पादन घटल्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. यावेळी अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन आढळल्याची माहिती उपस्थितांनी दिली. पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षांकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या प्रयोगावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधी मंगेश कांबळे व सोमनाथ लोहार, मंडळ अधिकारी श्रीनिवास पवार, ग्राम महसूल अधिकारी बालाजी लाकाळ, ग्रामविकास अधिकारी चैतन्य गोरे उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे, सिकंदर बेगडे, सुधीर गायकवाड, निरंजन करंडे, इंद्रजीत घोटकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाची नोंद आणि त्यानंतरचा अधिकृत अहवाल शेतकऱ्यांना मिळणारी पीकविमा भरपाई व नुकसानभरपाईच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

0
8
5
6
2
6



