Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकरणाला नवे वळण! शासकीय कामात अडथळा व विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीस तुळजापूर न्यायालयाकडून जामीन

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकरणाला नवे वळण! शासकीय कामात अडथळा व विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीस तुळजापूर न्यायालयाकडून जामीन

0 8 5 6 2 6

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकरणाला नवे वळण!

शासकीय कामात अडथळा व विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीस तुळजापूर न्यायालयाकडून जामीन

तुळजापूर,: प्रतिनिधी

चर्चेचा विषय ठरलेल्या तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कथित गैरवर्तन, शिवीगाळ केल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीस तुळजापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.

या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४५५/२०२६ भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, १३२, ३५२, १२६(२) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रतिबंध) अधिनियम, २०१० मधील कलम ४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या फिर्यादीनुसार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात संबंधित आरोपी एका महिला रुग्णासोबत तेथे आला होता. संबंधित महिला रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने वैद्यकीय उपचार करा, असे म्हणत आरोपीने डॉक्टरांशी वाद घालत कथितरित्या शिवीगाळ केली तसेच गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर डॉक्टरांच्या अंगावर धावून जाणे व मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर डॉक्टरांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीस दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी अटक केली होती.

दरम्यान, आरोपीच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी न्यायालयात बाजू मांडत सविस्तर युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा मुद्दा ग्राह्य धरत आरोपीस जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संजय पवार यांचे मार्गदर्शन, तर ॲड. ओंकार मस्के यांचे सहकार्य लाभल्याचे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे