ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापुरात भरधाव कारचा काळ! जुन्या बसस्थानकाजवळ पादचाऱ्याला जोरदार धडक; ४० वर्षीय अहमद अन्सारी यांचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!

0
8
5
6
2
0
तुळजापुरात भरधाव कारचा काळ! जुन्या बसस्थानकाजवळ पादचाऱ्याला जोरदार धडक; ४० वर्षीय अहमद अन्सारी यांचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!
तुळजापूर : प्रतिनिधी
शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ देवराज चिकन दुकानासमोर कारच्या धडकेत अहमद रुबाब अन्सारी (वय ४०, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर) यांचा मृत्यू झाला. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी कारचालक हर्षद नंदकिशोर खाकीवाले (वय ३०, रा. गवळीपुरा, मामा चौक, जालना) याच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद अन्सारी पायी जात असताना संबंधित कारने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मैनुदीन रुबाब अन्सारी यांनी २९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
0
8
5
6
2
0



