Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘जनता दरबार’

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम; नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या सूचनेनुसार नगरसेवक मधुकर शेळके यांचा पुढाकार

0 8 5 6 2 6

प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘जनता दरबार’

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम; नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या सूचनेनुसार नगरसेवक मधुकर शेळके यांचा पुढाकार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न एकाच ठिकाणी जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या सूचनेनुसार, प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक मधुकर शेळके यांच्या पुढाकारातून या जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे.

नागरिकांच्या समस्या थेट ऐकून सोडविण्यावर भर

प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नाल्या, पथदिवे तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित नागरिकांच्या समस्या व तक्रारी या जनता दरबारात मांडता येणार आहेत. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित विभागाच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यावर भर दिला जाणार आहे.

“प्रभागातील नागरिकांना त्यांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत. त्यांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी जनता दरबार हा उपक्रम राबविण्यात येत आहे,” अशी भूमिका नगरसेवक मधुकर शेळके यांनी मांडली.

प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि नागरी सुविधांशी संबंधित मागण्या जनता दरबारात मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे