Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

गावठी दारू आणि देशी-विदेशी मद्याचा अवैध साठा जप्त! येवतीत ५० लिटर गावठी दारू हस्तगत; मुरूममध्ये ४८ बाटल्या जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

0 8 5 6 2 6

गावठी दारू आणि देशी-विदेशी मद्याचा अवैध साठा जप्त!

येवतीत ५० लिटर गावठी दारू हस्तगत; मुरूममध्ये ४८ बाटल्या जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

नळदुर्ग | तुळजापूर नामा

जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र कारवाया करून गावठी दारू आणि देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास येवती (ता. तुळजापूर) येथे गीता ज्ञानेश्वर लवटे (वय ३६) यांच्या राहत्या घराशेजारी सुमारे ४ हजार १०० रुपये किमतीची ५० लिटर गावठी दारू आढळली. अवैध विक्रीच्या उद्देशाने दारू बाळगल्याचा आरोप असून, पोलिसांनी ती जप्त केली.

दुसऱ्या कारवाईत १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुरूम येथील खंडोबा मंदिर रस्त्यावर लक्ष्मण रुपचंद अंबुसे यांच्याकडून सुमारे ३ हजार ८४० रुपये किमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या ४८ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मद्याचीही अवैध विक्रीसाठी साठवणूक केल्याचा आरोप आहे.

दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे