Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

देवकुरळीत गावठी दारूचा अवैध धंदा उघड! १८ लिटर दारू जप्त; महिलेसह गुन्हा दाखल

तामलवाडी पोलिसांची कारवाई; १,८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

0 8 5 6 2 6

देवकुरळीत गावठी दारूचा अवैध धंदा उघड! १८ लिटर दारू जप्त; महिलेसह गुन्हा दाखल

तामलवाडी पोलिसांची कारवाई; १,८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

तुळजापूर | तुळजापूरनामा

गावठी दारूच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी तामलवाडी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. देवकुरळी येथे राहत्या घरासमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली १८ लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी साळुबाई चंद्रकांत तुळसे (वय ४४, रा. देवकुरळी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या गावठी दारूची किंमत अंदाजे १ हजार ८७० रुपये आहे. अवैध मद्यसाठा जप्त करून संबंधित महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अवैध मद्यविक्रीविरोधातील या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा दारू व्यवसायावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे