Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

गणेशोत्सवात ‘उत्सव’ नव्हे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा संकल्प!

राजे संभाजी तरुण मंडळाचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धक पुस्तके अन् चॉकलेटचे वाटप

0 8 5 6 2 0

गणेशोत्सवात ‘उत्सव’ नव्हे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा संकल्प!

राजे संभाजी तरुण मंडळाचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धक पुस्तके अन् चॉकलेटचे वाटप

तुळजापूर | प्रतिनिधी

गणेशोत्सव म्हटले की उत्साह, जल्लोष आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम… मात्र तुळजापूरातील राजे संभाजी तरुण मंडळाने उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक देण्याचा अनोखा उपक्रम राबविला. “एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धक पुस्तके आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष विनोद पिंटू गंगणे यांच्या संकल्पनेतून आणि मंडळाचे संस्थापक विशाल छत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तहसीलदार तथा मंदिर प्रशासक माया माने यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

◾‘मोबाईलऐवजी पुस्तक, हातात शिक्षणाची मशाल!’

विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक आणि मनात शिक्षणाची जिद्द निर्माण करणारे उपक्रम आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहेत, असे मत तहसीलदार माया माने यांनी यावेळी व्यक्त केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचा मंडळाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

गणरायाची आरती, पुस्तकांचे वाटप आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद यामुळे उपक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले.

◾वर्गणीमुक्त मंडळाची सामाजिक बांधिलकी

विशेष म्हणजे राजे संभाजी तरुण मंडळ हे वर्गणीमुक्त मंडळ असून, सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्याचा हा उपक्रम ठरत आहे.

गणेशोत्सवात फक्त गणरायाची आराधना नाही, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करण्याचा संकल्प—राजे संभाजी तरुण मंडळाने दिलेली ही ‘ज्ञानाची शिदोरी’ तुळजापूरच्या गणेशोत्सवात वेगळा आदर्श ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे