Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना जामीन मंजूर! ॲड. विराज जगदाळे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय

ॲड विराज विलासराव जगदाळे

0 8 5 6 2 6

तुळजापूर गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना जामीन मंजूर! ॲड. विराज जगदाळे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय

तुळजापूर | तुळजापूरनामा

तुळजापूर शहरातील धाराशिव–तुळजापूर रस्त्यावरील पार्किंगसमोर, कणे स्टॉप परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. ऐन नवरात्रीत गजबजलेल्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांतील वादातून हाणामारी आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गु.र. नं. ५१२/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आता या प्रकरणातील दोन मुख्य अटक आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादानंतर हा निर्णय झाल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

नेमके प्रकरण काय?

नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजापूर शहरातील गजबजलेल्या कणे स्टॉप परिसरात मध्यरात्री दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी आणि गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित परिसरातील बंदोबस्त वाढवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी अग्नीशस्त्र अर्थात पिस्तूल, पिवळ्या रंगाची रिकामी पुंगळी तसेच एक इनोव्हा कार जप्त केली होती. या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या दोन मुख्य आरोपींच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी वकीलपत्र दाखल करून जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. आरोपींच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद आणि प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.

या प्रकरणात ज्येष्ठ वकील ॲड. संजय पवार यांचे मार्गदर्शन, तर ॲड. ओंकार मस्के यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले आहे.

 

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे