Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पाटील तांड्यावर संयुक्त धाड; हातभट्टी दारूच्या साम्राज्यावर बुलडोझर

राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांची संयुक्त कारवाई; १२,५०० लिटर रसायन, ७०० लिटर गावठी दारू जप्त, १४ जणांवर गुन्हे

0 8 5 6 2 6

पाटील तांड्यावर संयुक्त धाड; हातभट्टी दारूच्या साम्राज्यावर बुलडोझर

राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांची संयुक्त कारवाई; १२,५०० लिटर रसायन, ७०० लिटर गावठी दारू जप्त, १४ जणांवर गुन्हे

तुळजापूर | प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारूच्या व्यवसायावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मोठा घाव घालत तुळजापूर तालुक्यातील पाटील तांडा (खुदावाडी) येथे धडक छापेमारी केली. या कारवाईत १२ हजार ५०० लिटर गुळमिश्रित रसायन, ७०० लिटर गावठी हातभट्टी दारू असा तब्बल ५ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १४ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, संगिता दरेकर उप आयुक्त संभाजीनगर,धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई पार पडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,पोलीस उपअधीक्षक मनोहर पाटील, उपअधीक्षक मारुती मुपडे, निरीक्षक डी.एल.दिंडकर,राहुल बांगर, हरीभाऊ लांडे तसेच राज्य उत्पादन शुल्क आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

छाप्यात पाटील तांड्यात विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या बॅरलमध्ये बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे गुळमिश्रित रसायन आणि तयार हातभट्टी दारू आढळून आली. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून संबंधित १४ आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणले.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, अवैध मद्यनिर्मितीच्या साखळीचा तपास सुरू आहे.

जिल्ह्यात हातभट्टी दारूच्या अवैध धंद्यांवर आक्रमक कारवाईचा धडाका कायम राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या संयुक्त धाडीतून प्रशासनाने दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे