ब्रेकिंगमहाराष्ट्र
दुष्काळात बळीराजाची दिवाळी गोड करणार! एकनाथ शिंदेंच्या निर्देशानुसार धाराशिवच्या शेतकरी कुटुंबांना दिवाळी किट; शिवसेनेकडून मदतीचे नियोजन

0
8
5
6
2
0
दुष्काळात बळीराजाची दिवाळी गोड करणार!
एकनाथ शिंदेंच्या निर्देशानुसार धाराशिवच्या शेतकरी कुटुंबांना दिवाळी किट; शिवसेनेकडून मदतीचे नियोजन
धाराशिव : तुळजापूर नामा
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळी किट तयार करण्यात आले असून, त्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना देण्यात आली.
◾फराळापासून कंदील-पणत्यांपर्यंत साहित्य
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या किटमध्ये दिवाळीच्या फराळाचे साहित्य, कंदील, पणत्या, कालनिर्णय यांसह विविध वस्तूंचा समावेश आहे. जिल्ह्यातील गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख कार्यरत राहणार आहेत. मतदारसंघातील गोरगरीब नागरिकांनाही या किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
◾दुष्काळाच्या झळा; बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न
धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी शेती आणि शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. पीक परिस्थिती प्रतिकूल असताना अनेक कुटुंबांसमोर सण साजरा करण्याचेही आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्यांच्या घरात दिवाळीचा प्रकाश पोहोचावा, या भावनेतून मदतीचे नियोजन करण्यात आल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.
◾मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान
दुष्काळग्रस्त भागातील गरजू कुटुंबांपर्यंत दिवाळी किट पोहोचविण्यासाठी स्थानिक शिवसैनिकांच्या माध्यमातून वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे. संकटाच्या काळात शेतकरी कुटुंबांना आधार देण्याचा हा प्रयत्न असून, प्रत्यक्ष किती कुटुंबांना मदत मिळते आणि वितरण किती प्रभावीपणे होते, याकडे लक्ष लागले आहे.
दुष्काळाच्या झळांनी बेजार झालेल्या बळीराजाच्या घरात दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा संकल्प शिवसेनेने व्यक्त केला आहे.
0
8
5
6
2
0



