Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शहाजी महाद्वार तात्काळ खुला करा; अन्यथा पुजारी ओंकार भिसे यांचा ८ जुलैला आत्मदहनाचा इशारा

महाद्वार बंद असल्याने भाविक, व्यापारी व पुजारी अडचणीत; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0 8 5 6 2 6

शहाजी महाद्वार तात्काळ खुला करा; अन्यथा पुजारी ओंकार भिसे यांचा ८ जुलैला आत्मदहनाचा इशारा

महाद्वार बंद असल्याने भाविक, व्यापारी व पुजारी अडचणीत; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

श्री तुळजाभवानी मंदिरातील राजे शहाजी महाद्वार भाविकांसाठी तात्काळ खुले करण्यात यावा, अन्यथा मंदिराचे पुजारी ओंकार लक्ष्मीकांत भिसे हे येत्या ८ जुलै २०२६ रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयासमोर आत्मदहन करतील, असा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि तहसीलदार तथा विश्वस्त यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राजे शहाजी महाद्वार हा पूर्वापार मंदिरात प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग असून तो तुळजापूर शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडलेला आहे. त्यामुळे भाविकांना या मार्गाने मंदिरात पोहोचणे अत्यंत सोयीचे होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्राधिकरणाच्या कामाचे कारण देत मंदिर प्रशासनाने हा मार्ग बंद ठेवला आहे.
महाद्वार बंद असल्यामुळे तुळजापूर शहरातील व्यापारी व पुजारी यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, पर्यायी म्हणून वापरल्या जाणाऱ्या बिडकर पायऱ्या उंच व खड्या असल्याने वृद्धांसह अनेक भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, मंदिर प्रशासनाने राजे शहाजी महाद्वार तातडीने भाविकांसाठी खुला न केल्यास मंदिराचे पुजारी ओंकार लक्ष्मीकांत भिसे हे ८ जुलै २०२६ रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत. तसेच या घटनेत त्यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मंदिर प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनामुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली असून, मंदिर प्रशासन यावर काय निर्णय घेणार आणि भाविकांच्या सोयीसाठी शहाजी महाद्वार पुन्हा खुला होणार का, याकडे भाविक, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे