Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने ऊर्जा प्राप्त होते! पुणे आयुक्तालयाच्या प्रशासन अधिकारी रजनी रावडे यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन; मंदिर संस्थानकडून सत्कार

तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने ऊर्जा प्राप्त होते! पुणे आयुक्तालयाच्या प्रशासन अधिकारी रजनी रावडे यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन; मंदिर संस्थानकडून सत्कार

0 8 5 6 2 6

तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने ऊर्जा प्राप्त होते!

पुणे आयुक्तालयाच्या प्रशासन अधिकारी रजनी रावडे यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन; मंदिर संस्थानकडून सत्कार

तुळजापूर, : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पुणे येथील आयुक्तालयाच्या प्रशासन अधिकारी वर्ग-१ श्रीमती रजनी रावडे यांनी दि. २५ सप्टेंबर शुक्रवार रोजी तुळजापूर येथे भेट देत आई तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.

दर्शनानंतर श्रीमती रजनी रावडे म्हणाल्या, “श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मनाला समाधान मिळते आणि नव्या ऊर्जेची प्राप्ती होते.” मंदिरातील धार्मिक वातावरणाने आपण भारावून गेल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी श्री. जयसिंगराव पाटील यांच्या हस्ते श्रीमती रजनी रावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे नातेवाईक तसेच श्री. प्रकाश मगर उपस्थित होते.

आई तुळजाभवानीच्या चरणी माथा टेकवत त्यांनी मंदिरातील धार्मिक परंपरा आणि व्यवस्थेची माहिती घेतली. त्यांच्या या भेटीमुळे मंदिर परिसरातही भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे