Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनी छावाचा पालकमंत्र्यांना दणका; एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह मराठवाड्यासाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी!

बसमध्ये सीसीटीव्ही, कायदा व विमा सुविधेसाठी निवेदन; अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने १ हजार कोटींच्या महामंडळाची मागणी

0 8 5 6 2 6

स्वातंत्र्यदिनी छावाचा पालकमंत्र्यांना दणका; एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह मराठवाड्यासाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी!

बसमध्ये सीसीटीव्ही, कायदा व विमा सुविधेसाठी निवेदन; अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने १ हजार कोटींच्या महामंडळाची मागणी

धाराशिव : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना, अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन, राष्ट्रीय मराठा महासंघ, स्वराज्य सेना व वाहतूक आघाडी यांच्या वतीने परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना दोन महत्त्वपूर्ण निवेदने देण्यात आली. एसटी चालक-वाहकांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच मराठवाड्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

◾एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी

गेल्या काही दिवसांत एसटी चालक व वाहकांवर हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्येक एसटी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदेशीर तरतूद करावी, वेळेवर वेतन द्यावे तसेच विमा सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

◾मराठवाड्यासाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी

दुसऱ्या निवेदनाद्वारे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने मराठवाड्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तातडीने स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. केवळ अभ्यासगट किंवा समित्या स्थापन करून प्रश्न सुटणार नाहीत, तर मराठवाड्यातील बेरोजगारी, शेतीसाठी पाण्याची कमतरता आणि वाढते स्थलांतर रोखण्यासाठी १ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी केली.

दोन्ही निवेदने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वीकारून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

यावेळी अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे अध्यक्ष खंडू राऊत, राष्ट्रीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संकेत सूर्यवंशी, स्वराज्य सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल लोमटे, वाहतूक आघाडीचे अध्यक्ष शिवहरी भोसले, ज्ञानदेव गुळवे यांच्यासह छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनकर्ता : राजाभाऊ साळुंके, जिल्हाध्यक्ष, छावा संघटना, धाराशिव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे