Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री विठ्ठल पतसंस्थेत गणरायाची भक्तिमय आरती; नगरसेवक मधुकर शेळके यांचा सत्कार!

मधुकर शेळके यांच्या हस्ते श्रींची महाआरती; शाल-श्रीफळ देऊन केला सन्मान

0 8 5 6 2 6

श्री विठ्ठल पतसंस्थेत गणरायाची भक्तिमय आरती; नगरसेवक मधुकर शेळके यांचा सत्कार!

मधुकर शेळके यांच्या हस्ते श्रींची महाआरती; शाल-श्रीफळ देऊन केला सन्मान

तुळजापूर | तुळजापूरनामा

गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल सहकारी पतसंस्था मर्यादित, धाराशिव शाखा तुळजापूर येथे श्री गणरायाची आरती उत्साहात पार पडली. तुळजापूर नगरीचे नगरसेवक मधुकर शेळके यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. आरतीच्या वेळी उपस्थितांनी गणरायाचा जयघोष करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला.

यावेळी पतसंस्थेच्या वतीने नगरसेवक मधुकर शेळके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या प्रसंगी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक भूमकर पद्मसिंह, लिपिक कानडे अविनाश, गंधोरे, केदारी आप्पा, रोखपाल पवन मालकुनाईक तसेच छोरीया समूहाचे तुळजापूर शाखा व्यवस्थापक महेश निंबाळकर यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

श्रींच्या आरतीनंतर उपस्थितांनी गणरायाचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे पतसंस्थेच्या शाखेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्ती, सामाजिक एकोपा आणि परस्पर स्नेहाचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे