Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रतिबंधित गुटखा तस्करी प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर.

ॲड. विराज जगदाळे यांचा प्रभावी युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय.

0 8 5 6 2 6

प्रतिबंधित गुटखा तस्करी प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर.

ॲड. विराज जगदाळे यांचा प्रभावी युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर बार्शी मार्गावर ढेकरी शिवारात पोलिसांनी केलेल्या कारवाईत राज्यात प्रतिबंधित असलेला तब्बल एक लाख रुपयांचा गुटखा तुळजापूर पोलिसांनी सापळा रचत जप्त केला होता. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 26 जुलै 2026 रोजी पहाटे एक वाजण्याचे सुमारास ढेकरी शिवारातील राजवीर हॉटेल समोर दोन संशयित व्यक्ती हे गुटख्याची अवैद्य तस्करी करीत असल्याचे पोलिसांना समजले त्यावेळी घटनास्थळावरून संशयित आरोपींकडून एक लाख रुपयांचा मुद्देवाल जप्त करत तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 374 /2026 कलम 274, 275, 223, 123, 3(5) अन्वये तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील आरोपींच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी वकीलपत्र घेत जिल्हा व सत्र न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला सरकारी व बचाव पक्षाचा मुद्दा ऐकल्यानंतर बचाव पक्षाचा मुद्दा ग्राह्य धरत जिल्हा न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे बहुचर्चित प्रकरणाची तालुक्यात पुन्हा चर्चा रंगत आहे याप्रकरणी ज्येष्ठ वकील संजय पवार यांचे मार्गदर्शन तर ॲड. ओमकार मस्के, ॲड. रामानंद गुळमिरे (धाराशिव) यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे