Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता मला संरक्षण द्या – जि प सदस्य; दयानंद शिंदेंचा दावा

माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता मला संरक्षण द्या - जि प सदस्य; दयानंद शिंदेंचा दावा

0 8 5 6 2 6

माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता मला संरक्षण द्या – जि प सदस्य; दयानंद शिंदेंचा दावा

तुळजापूर : काक्रंबा जिल्हा परिषद गटात फिरत असताना आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी काक्रंबा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

आपली राजकीय ताकद वाढत असल्याने काही जणांकडून आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. “हा वाद राजकीय असून, माझ्या जीवाला धोका आहे,” असा दावा त्यांनी केला. या वेळी काही व्हॉइस रेकॉर्डिंग आणि व्हिडिओही त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर सादर केले.

“मी कोणाच्या दबावाला बळी पडणारा कार्यकर्ता नाही. खोट्या ॲट्रॉसिटी दाखल करणारा माणूसही नाही. समाजाला कधीही बदनाम करणार नाही. मतदार आणि समाजातील लोकांसाठी कोणत्याही आर्थिक फायद्याच्या अपेक्षेने काम करत नसून, अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.

काक्रंबा जिल्हा परिषद गटात आपले राजकीय वर्चस्व वाढत असल्यानेच विरोधकांकडून षडयंत्र रचले जात असल्याचे शिंदे म्हणाले. “माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मला संरक्षण देणे गरजेचे आहे. लवकरच गुंडगिरीचे आणखी पुरावे जनतेसमोर सादर करणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे