ब्रेकिंगमहाराष्ट्र
सिंदफळ शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध; शिक्षणाच्या विकासाला नवे नेतृत्व
विश्वंभर लांडगे अध्यक्ष, ॲड. श्रुती देगनाळ उपाध्यक्षा; शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा निर्धार
0
8
5
6
2
0
सिंदफळ शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध; शिक्षणाच्या विकासाला नवे नेतृत्व
विश्वंभर लांडगे अध्यक्ष, ॲड. श्रुती देगनाळ उपाध्यक्षा; शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा निर्धार
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २, सिंदफळ येथे सन २०२६–२८ या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडीत विश्वंभर गिरजाप्पा लांडगे यांची अध्यक्षपदी, तर ॲड. श्रुती सुरेश देगनाळ यांची उपाध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

नव्या समितीच्या स्थापनेनंतर गावात समाधानाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि शाळेच्या विकासासाठी समिती प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
समितीवर भालचंद्र सुखदेव माळी, दत्तात्रय चंद्रकांत जानकर, योगेश भैरू धनके, अमोल विश्वंभर पवार, राधिका अतुल मिसाळ, ललिता उमेश शिंदे, रेणुका धनाजी शिंदे, दिपाली समाधान ठोंबरे, पूजा मारुती शिंदे आणि निलावती तानाजी व्यवहारे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शाळेच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, पालकांचा सहभाग वाढविणे आणि शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निवड प्रक्रियेस मुख्याध्यापिका सौ. अंधारे ए. के., सौ. भोसले एम. के., सौ. देशमुख एस. आर., सौ. पाठक व्ही. एस., सौ. शेटे पी. पी., सौ. माळी ए. के., सौ. निकम जे. एस. तसेच शिक्षक मनोज क्षीरसागर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विशेष म्हणजे, उपाध्यक्षा म्हणून निवड झालेल्या ॲड. श्रुती सुरेश देगनाळ यांच्या कायदेशीर ज्ञान, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोनाचा शाळेच्या विकासासाठी निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २, सिंदफळ ही शिक्षण, संस्कार आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने नवी भरारी घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
0
8
5
6
2
0



