Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बलात्कार व पॉक्सो प्रकरणातील आरोपीस नियमित जामीन

ॲड.विशाल साखरे यांच्या युक्तिवादाला यश; विलंबित फिर्याद, शाळेला सुट्टी असतानाच्या कथित घटनेवर बचाव पक्षाने उपस्थित केले प्रश्न

0 8 5 6 2 0

बलात्कार व पॉक्सो प्रकरणातील आरोपीस नियमित जामीन

ॲड.विशाल साखरे यांच्या युक्तिवादाला यश; विलंबित फिर्याद, शाळेला सुट्टी असतानाच्या कथित घटनेवर बचाव पक्षाने उपस्थित केले प्रश्न

धाराशिव : प्रतिनिधी

बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत ढोकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ यास विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने अटींच्या अधीन राहून नियमित जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९/२०२६ अन्वये पॉक्सो कायद्याच्या कलम ४,६ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपीच्या वतीने नियमित जामीन अर्ज दाखल करण्यात आला.

सुनावणीदरम्यान ॲड.साखरे यांनी फिर्याद दाखल करण्यास झालेला सुमारे दोन महिन्यांचा विलंब, घटनेची कथित तारीख, पीडितेच्या शाळेच्या उपस्थितीबाबतचे तथ्य आणि तपासातील विविध बाबींवर न्यायालयाचे लक्ष वेधले.

बचाव पक्षाच्या म्हणण्यानुसार, फिर्यादीत नमूद केलेल्या घटनेच्या दिवशी संबंधित जिल्हा परिषद शाळेला शासकीय सुट्टी असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला. त्यामुळे पीडिता शाळेतून आल्यानंतर घटना घडल्याच्या कथनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

याशिवाय, DNA नमुना व वैद्यकीय प्रमाणपत्राशी संबंधित बाबी, आरोपीचा कथित घटनेशी संबंध नसणे,आरोपीला प्रकरणात गोवण्यात आल्याचा बचाव पक्षाचा दावा तसेच तपास पूर्ण झाल्याने आरोपीला पुढे कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसणे, या मुद्द्यांवरही युक्तिवाद करण्यात आला.ॲड.साखरे यांनी यावेळी विविध न्यायालयीन दाखलेही सादर केले.

बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ठुबे यांनी आरोपीस अटींच्या अधीन राहून नियमित जामीन मंजूर केला.

या प्रकरणात ॲड.विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे,ॲड. महेश लोहार,ॲड. अमित गोळे,ॲड. शुभम तांबे,ॲड. संकेत गोरे,ॲड. अर्चना कांबळे,ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड. आकाश एडके,ॲड.ओंकार कोरेगावकर,ॲड.रोहित लोमटे,ॲड. पृथ्वीराज खोचरे आणि ॲड. महेश पवार यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे