ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीकडून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा भव्य सत्कार
सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गाच्या लढ्याच्या आठवणींना उजाळा; रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत
0
8
5
6
2
6
तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीकडून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा भव्य सत्कार
सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गाच्या लढ्याच्या आठवणींना उजाळा; रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत
तुळजापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आलेले केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने हडको कॉलनी येथे उत्साहात स्वागत करून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बहुप्रतीक्षित सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गासाठी झालेल्या दीर्घ संघर्षाच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी तुळजापूर शहरात झालेल्या पहिल्या रेल्वे हक्क कृती परिषदेत श्रीपाद नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे त्यांच्या तुळजापूर दौऱ्याच्या निमित्ताने रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष स्वागत केले.

हडको कॉलनी येथील गुलशन व्यवहारे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनराव गावडे, ज्येष्ठ सल्लागार अंबादासराव पोपळे, अशोकराव साळुंखे, रत्नाकर खोले, गणेश जळके, मोहन भोसले, अनिल हंगरगेकर, खय्युम शेख, गोविंद दिवटे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी श्रीपाद नाईक यांचा हार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधान परिषद आमदार सुजितसिंह ठाकूर यांचाही समितीच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी काका चालुक्य, रामदास नाना कोळगे, ॲड. अनिल काळे, गुलचंद व्यवहारे, प्रा. संभाजी भोसले, प्रा. प्रदीप हंगरगेकर, इंद्रजित साळुंखे, सागर पारडे, विकास मलबा आणि साहेबराव घुगे यांच्यासह तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गासाठी सातत्याने झालेल्या संघर्षात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. या रेल्वेमार्गामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासह भाविक, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
0
8
5
6
2
6



