ब्रेकिंगमहाराष्ट्र
लोकमंगल मल्टीस्टेटच्या चेअरमनपदी बालाजी शिंदे; तुळजापुरात सत्कार!
संचालक सचिन अडगळे यांच्या हस्ते गौरव; शाखेतील पदाधिकारी व कर्मचारीवर्गाची उपस्थिती

0
8
5
6
2
6
लोकमंगल मल्टीस्टेटच्या चेअरमनपदी बालाजी शिंदे; तुळजापुरात सत्कार!
संचालक सचिन अडगळे यांच्या हस्ते गौरव; शाखेतील पदाधिकारी व कर्मचारीवर्गाची उपस्थिती
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लिमिटेड, सोलापूरच्या चेअरमनपदी बालाजी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल तुळजापूर शाखेच्या वतीने त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. संस्थेच्या नव्या नेतृत्वाची जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने सभासद, पदाधिकारी आणि कर्मचारीवर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
लोकमंगल मल्टीस्टेटच्या तुळजापूर शाखेत आयोजित सत्कार समारंभात संस्थेचे संचालक सचिन अडगळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन बालाजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि सभासदकेंद्रित कामकाजाला महत्त्व देत संस्थेची वाटचाल सुरू आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून संस्थेच्या कामकाजाला अधिक बळ मिळेल आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देत विविध उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
सत्कार स्वीकारताना बालाजी शिंदे यांनी संस्थेने सोपविलेली जबाबदारी ही विश्वासाची पावती असून, पदाच्या माध्यमातून सभासद, ठेवीदार आणि संस्थेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जाधव यांच्यासह तुळजापूर शाखेतील सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शाखेतील कर्मचारीवर्गानेही नवनिर्वाचित चेअरमनांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती अधिक वेगाने व्हावी, अशा शुभेच्छा दिल्या.
लोकमंगल मल्टीस्टेटच्या तुळजापूर शाखेने यापूर्वीही विविध सामाजिक आणि सभासदाभिमुख उपक्रमांत सहभाग घेतला आहे. त्यामुळे बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पदाधिकारी व कर्मचारीवर्गाने व्यक्त केला.
सहकार क्षेत्रातील विश्वासाची परंपरा कायम ठेवत संस्थेच्या विस्तारासोबतच सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आव्हान आता नव्या नेतृत्वासमोर आहे. बालाजी शिंदे यांच्या निवडीमुळे लोकमंगल मल्टीस्टेटच्या पुढील वाटचालीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
0
8
5
6
2
6



