ब्रेकिंगमहाराष्ट्र
नळदुर्गजवळ भरधाव कंटेनरचा पायी जाणाऱ्या भाविकांना धक्का! एकजन मयत तिघे जखमी; रुग्णवाहिकेला विलंब, महामार्ग पोलिसांनी दाखवली तत्परता
नळदुर्गजवळ भरधाव कंटेनरचा पायी जाणाऱ्या भाविकांना धक्का! एकजन मयत तिघे जखमी; रुग्णवाहिकेला विलंब, महामार्ग पोलिसांनी दाखवली तत्परता

0
8
5
6
2
9
नळदुर्गजवळ भरधाव कंटेनरचा पायी जाणाऱ्या भाविकांना धक्का! एकजन मयत तिघे जखमी; रुग्णवाहिकेला विलंब, महामार्ग पोलिसांनी दाखवली तत्परता
नळदुर्ग | तुळजापूरनामा
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या कर्नाटकातील भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नळदुर्गजवळ भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पायी चालत जाणाऱ्या भाविकांना धडक दिल्याने एकजन मयत तर तिघेजण गंभिर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.एक्सीडेंट चे प्रमाण कमी होण्यासाठी हायवे ट्रॉफी पोलीस वेगवेगळे उपक्रमा राबवत आहे.

रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने पोलिसांनी वेळ न दवडता आपल्या वाहनातून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची धडपड केली.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह कर्नाटक आणि अन्य राज्यांतून हजारो भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी येत आहेत. अशा वेळी महामार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. नळदुर्गजवळ घडलेल्या या अपघाताने त्याची जाणीव पुन्हा करून दिली आहे.

महामार्ग पोलिसांची तत्परता; जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याकरिता पोलिसांनी स्वतःच्या वाहनाचा वापर केला. संकटाच्या प्रसंगी पोलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी परावर्तक पट्ट्यांचे वाटप
पायी चालत जाणाऱ्या भाविकांना रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सहज ओळखता यावे आणि संभाव्य अपघातांचा धोका कमी व्हावा, यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने भाविकांना परावर्तक पट्ट्या (रिफ्लेक्टिव्ह टेप) लावून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश या पट्ट्यांवर पडल्यास पादचारी दूरून दिसण्यास मदत होते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.
मात्र, केवळ परावर्तक पट्ट्या लावून जबाबदारी संपत नाही. भरधाव वाहनांवर नियंत्रण, महामार्गावरील प्रभावी वाहतूक व्यवस्थापन आणि अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळणेही तितकेच आवश्यक आहे. नवरात्रोत्सवासाठी पायी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
0
8
5
6
2
9



