ब्रेकिंगमहाराष्ट्र
ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रकला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक जखमी! तुळजापूर–नळदुर्ग मार्गावर मानेवाडीजवळ भीषण अपघात
ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रकला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक जखमी! तुळजापूर–नळदुर्ग मार्गावर मानेवाडीजवळ भीषण अपघात

0
8
5
6
2
0
ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रकला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक जखमी! तुळजापूर–नळदुर्ग मार्गावर मानेवाडीजवळ भीषण अपघात
तुळजापूर–नळदुर्ग मार्गावरील मानेवाडी शिवारात दुर्घटना; ट्रॅक्टर चालकाविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
नळदुर्ग : प्रतिनिधी
तुळजापूर–नळदुर्ग मार्गावर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. मानेवाडी शिवारातील हॉटेल सर्जा राजासमोर १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती माणिक म्हैत्री (वय २४) आणि हणमंत रामलु उडबले, दोघेही रा. मुस्तीर, ता. चिटगुप्पा, जि. बिदर, हे ट्रक क्रमांक केए ५६ ए ०२६७ मधून प्रवास करत होते. दरम्यान, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ४४ एस १८१३ वरील चालक रेनबा माधव गडदे (रा. गर्देवाडी, ता. परळी वैजनाथ, जि. बीड) हा ऊसाने भरलेला ट्रॅक्टर चालवत होता.
आरोपी चालकाने ट्रॅक्टर हयगयीने व निष्काळजीपणे चालवून अचानक उजव्या बाजूला वळविल्याने ट्रकच्या बॉडीला धडक बसल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या अपघातात मारुती म्हैत्री गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर हणमंत उडबले जखमी झाले.
या प्रकरणी हणमंत माणिक म्हैत्री यांनी २० ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(अ) आणि १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.
0
8
5
6
2
0



