Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाखांचा धनादेश; तुळजापूर तहसील कार्यालयामार्फत सुपूर्द

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काचोळे कुटुंबाला शासनाचा दिलासा

0 8 5 6 2 9

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काचोळे कुटुंबाला शासनाचा दिलासा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाखांचा धनादेश; तुळजापूर तहसील कार्यालयामार्फत सुपूर्द

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या तुळजापूर येथील दिगंबर वसंत काचोळे यांच्या कुटुंबाला राज्य शासनाने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून, तुळजापूर तहसील कार्यालयामार्फत हा धनादेश कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सातत्याने लढा उभारला होता. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाने मदत मंजूर केली. मुख्यमंत्री सचिवालयाचे कक्ष अधिकारी तथा सहकक्ष प्रमुख शरद घावटे यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हाधिकारी धाराशिव यांना पाठविले होते.

तुळजापूर तहसीलदारांच्या आदेशानुसार ग्राममहसूल अधिकारी शरद दूधभाते, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते काचोळे कुटुंबाला १० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

यावेळी तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी,राज्य समन्वयक आबासाहेब कापसे, विशाल छत्रे, कुमार टोले, प्रशांत इंगळे तसेच काचोळे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या पाठीशी शासन उभे राहिल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, तुळजापूर शहरात या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे