ब्रेकिंगमहाराष्ट्र
विकासाचा ध्यास, जनतेशी नाळ आणि तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्राला नवी ओळख! माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासपर्वाचा घेतलेला वेध; मंदिर विकासापासून रेल्वे प्रकल्पापर्यंत धाराशिवच्या विकासाला गती देण्याचे आव्हान!
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील साहेब

0
8
5
6
2
6
विकासाचा ध्यास, जनतेशी नाळ आणि तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्राला नवी ओळख! माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासपर्वाचा घेतलेला वेध; मंदिर विकासापासून रेल्वे प्रकल्पापर्यंत धाराशिवच्या विकासाला गती देण्याचे आव्हान!
तुळजापूरनामा : धाराशिव
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी स्थान निर्माण केलेले तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार तथा माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या राजकीय प्रवासासह तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास, पायाभूत सुविधांची उभारणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांच्या नेतृत्वाची चर्चा होत आहे.

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, मंदिर परिसराचे जतन व्हावे आणि तुळजापूरला आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करता यावे, यासाठी मंदिर विकास आराखड्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सुमारे १,३०० ते १,३८५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा उल्लेख होत असून, पहिल्या टप्प्यातील ५५५ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदांना मान्यता मिळाल्याची माहिती आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी ऑक्टोबर २०२५ मध्ये १८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा येथील रस्ते विकासासाठी ३६७ कोटी रुपये, तर तेर, जागजी आणि माणकेश्वर तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ४६ कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेखही महत्त्वाचा आहे. सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गासाठी ३,२९५ कोटी रुपयांच्या मंजूर प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या दळणवळणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, कामांचा दर्जा आणि निर्धारित वेळेत पूर्तता हे आगामी काळातील महत्त्वाचे निकष ठरणार आहेत.
दुसरीकडे, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ५०० कोटी रुपयांहून अधिक कर्जमाफी जाहीर झाल्याचा मुद्दाही चर्चेत आहे. मात्र, दुष्काळ, पाणीटंचाई, पीक नुकसानीची भरपाई आणि शेतीमालाला योग्य भाव या प्रश्नांवर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळणे तितकेच आवश्यक आहे.

राजकारणात केवळ घोषणा नव्हे, तर विकासकामांची पूर्तता आणि जनतेच्या प्रश्नांना मिळणारा प्रतिसाद नेतृत्वाची खरी कसोटी ठरतो. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, तुळजापूरच्या तीर्थक्षेत्र विकासासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या अपेक्षाही व्यक्त होत आहेत. मंजूर प्रकल्पांना गती, शेतकऱ्यांना दिलासा आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक यातूनच या नेतृत्वाच्या कार्याचा ठोस परिणाम अधोरेखित होणार आहे.

0
8
5
6
2
6



