ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानीच्या दर्शनानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते १०० महिलांना साडीवाटप
गुलचंद व्यवहारे यांचा सामाजिक उपक्रम; तुळजापुरात केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
0
8
5
6
2
0
तुळजाभवानीच्या दर्शनानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते १०० महिलांना साडीवाटप
गुलचंद व्यवहारे यांचा सामाजिक उपक्रम; तुळजापुरात केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
तुळजापूर : प्रतिनिधी
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दि. १८ जुलै रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तुळजापूर शहरात आगमन होताच त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे यांच्या वतीने आयोजित सामाजिक उपक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते १०० गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. गरजू महिलांसाठी राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, अनिल काळे, माजी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले, मंडल अध्यक्ष आनंद कंदले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे, बाळासाहेब भोसले, इंद्रजित साळुंके, सागर पारडे, विकास मलबा, साहेबराव घुगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आई तुळजाभवानीच्या दर्शनासोबतच गरजू महिलांसाठी सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा तुळजापूर दौरा विशेष ठरला.

0
8
5
6
2
0



