Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

खानापूरमध्ये काँग्रेसचा ‘हात’ मजबूत; नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश

प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती; संघटनात्मक बांधणीला नवे बळ

0 8 5 6 2 6

खानापूरमध्ये काँग्रेसचा ‘हात’ मजबूत; नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश

प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती; संघटनात्मक बांधणीला नवे बळ

धाराशिव : प्रतिनिधी

काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत धाराशिव तालुक्यातील खानापूर येथील नागरिकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे खानापूर परिसरात काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी प्रकाश रामचंद्र घायतीडक यांची धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच शंकर मधुकर सुतार, कुमोद संभाजी पवार, कांतीलाल जाधव, अनिल गरड आणि पांडुरंग गरड यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.

हा पक्षप्रवेश व नियुक्ती कार्यक्रम धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा सरचिटणीस गोरोबा झेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडला.

‘जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरा’

महागाई, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्ट व्यवस्था आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर काँग्रेस सातत्याने आवाज उठवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नव्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करावे, असे आवाहन करण्यात आले.

खानापूर परिसरातील नागरिकांचा काँग्रेसवरील विश्वास आणि प्रकाश घायतीडक यांच्यासारख्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यामुळे धाराशिव तालुक्यात पक्षाची संघटनात्मक मोर्चेबांधणी अधिक मजबूत होणार, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे