Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

लोकमंगलमध्ये भक्तीचा जागर अन् सुरक्षेची खबरदारी; पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची प्रत्यक्ष पाहणी

लोकमंगल मल्टीस्टेटमध्ये भक्तिमय सोहळा; चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा, सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना

0 8 5 6 2 6

लोकमंगलमध्ये भक्तीचा जागर अन् सुरक्षेची खबरदारी; पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची प्रत्यक्ष पाहणी

लोकमंगल मल्टीस्टेटमध्ये भक्तिमय सोहळा; चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा, सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना

तुळजापूर | तुळजापूर नामा

एकीकडे पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान, तर दुसरीकडे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा वाढता भार अशा दुहेरी संकटात बळीराजा अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने, पारंपरिक पद्धतीने आणि समाजभान जपत साजरा करण्याचे आवाहन लोकमंगल मल्टीस्टेटचे अध्यक्ष रोहन देशमुख व संचालक सचिन आडगळे यांनी केले.

लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लिमिटेड, सोलापूर-तुळजापूर शाखेच्या कार्यालयात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणरायाची महाआरती तुळजापूरचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडली. यावेळी शाखाधिकारी राजकुमार पवार, पदाधिकारी विनोद देवकर, खंडेराव देवकर, धीरज पाटील, सुनील साळुंके यांच्यासह बँकेचे कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चोरीच्या ठिकाणी पोलीस निरीक्षकांची पाहणी

महाआरतीनंतर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी लोकमंगलच्या कार्यालयाची पाहणी केली. यापूर्वी ज्या ठिकाणाहून चोरीची घटना घडली होती, त्या जागेचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. चोरी झालेल्या ठिकाणी आता भिंत बांधण्यात आली असल्याची पाहणी करताना त्यांनी कार्यालयातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

बँकेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक मांजरे यांनी दिल्या. कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी लोकमंगल मल्टीस्टेटच्या वतीने पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर आणि शिवाजी शिरसाट यांचा सचिन आडगळे व विनोद देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पर्यावरणपूरक गणरायाचा संदेश

माजी मंत्री सुभाष देशमुख आणि लोकमंगल समूहाचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या पुढाकारातून लोकमंगल मल्टीस्टेटच्या तुळजापूर कार्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

दरम्यान, ‘बळीराजाच्या जखमेवर डॉल्बीचा आवाज नको!’ असा सामाजिक संदेश देत लोकमंगल मल्टीस्टेटचे अध्यक्ष रोहन देशमुख व संचालक सचिन आडगळे यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन केले. पारंपरिक वाद्यांच्या साथीने उत्सव साजरा करावा, अनावश्यक ध्वनीप्रदूषण टाळावे आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या परिस्थितीचे भान ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ‘तुळजापूर नामा’ साप्ताहिक संपादक तथा तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाआरतीनंतर गणरायाच्या जयघोषाने लोकमंगल मल्टीस्टेट शाखेचा परिसर भक्तिमय झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे