Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अवैध मद्यसाठा जप्त; मालाचा पुरवठा कुठून झाला? तुळजापूरात दोन वाईन शॉप पुरवठादारावर कारवाई होणार का?; राज्य उत्पादन शुल्क प्रशासन झोपेत, पोलीस प्रशासन मात्र जोमात!

अवैध मद्यसाठा जप्त; मालाचा पुरवठा कुठून झाला? तुळजापूरात दोन वाईन शॉप पुरवठादारावर कारवाई होणार का?; राज्य उत्पादन शुल्क प्रशासन झोपेत, पोलीस प्रशासन मात्र जोमात!

0 8 5 6 2 6

अवैध मद्यसाठा जप्त; मालाचा पुरवठा कुठून झाला?

तुळजापूरात दोन वाईन शॉप पुरवठादारावर कारवाई होणार का?; राज्य उत्पादन शुल्क प्रशासन झोपेत, पोलीस प्रशासन मात्र जोमात!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

घाटशील रोड परिसरात पोलिसांनी अवैध मद्यसाठा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या कारवाईनंतर आता एक नवा प्रश्न उपस्थित होत आहे. जप्त करण्यात आलेला देशी, विदेशी मद्य व बिअरचा साठा नेमका कुठून आला? आणि त्याचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई होणार का ? तुळजापूर शहरात अधिकृतपणे मोजकीच वाईन शॉप कार्यरत असताना एवढ्या प्रमाणात मद्यसाठा आरोपीकडे कसा पोहोचला, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यावर कारवाई करून मूळ पुरवठा साखळीवर पडदा टाकला जाणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, मद्यविक्री व साठ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्कप्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात अवैध मद्यसाठा आढळून येत असताना संबंधित विभागाला याची माहिती नव्हती का? की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? अशी चर्चा रंगू लागली आहे.दुसरीकडे, तुळजापूर पोलीस प्रशासनाने मात्र धडक कारवाई करत अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे “राज्य उत्पादन शुल्क प्रशासन झोपेत आणि पोलीस प्रशासन जोमात” अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आता पोलिसांच्या तपासातून जप्त मद्याचा पुरवठा करणारे स्रोत समोर येतात का आणि संबंधित परवानाधारक विक्रेत्यांची चौकशी होते का, याकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे. मात्र वाईन शॉपमधूनच मद्याचा पुरवठा झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे