Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या १५४ पोलिसांना भावपूर्ण मानवंदना! धाराशिव पोलीस मुख्यालयात स्मृतिदिन शिस्तबद्ध वातावरणात

हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण; हवेत तीन फैरी झाडून वीर जवानांना सलामी, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्याकडून बलिदानाचे स्मरण

0 8 5 6 2 6

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या १५४ पोलिसांना भावपूर्ण मानवंदना! धाराशिव पोलीस मुख्यालयात स्मृतिदिन शिस्तबद्ध वातावरणात

हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण; हवेत तीन फैरी झाडून वीर जवानांना सलामी, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्याकडून बलिदानाचे स्मरण

धाराशिव : प्रतिनिधी

देशाच्या सुरक्षेसाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस वीरांच्या शौर्याला धाराशिव पोलीस दलाने बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी भावपूर्ण अभिवादन केले. पोलीस मुख्यालयात आयोजित ‘पोलीस स्मृतिदिन’ कार्यक्रमात हुतात्मा जवानांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. शिस्तबद्ध आणि भावूक वातावरणात झालेल्या या सोहळ्यात वीर जवानांना मानवंदना देण्यात आली.

पोलीस अधीक्षक रितू खोखर, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ आणि सहायक पोलीस निरीक्षक नमिता देशमुख यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी आरएसआय काटे आणि मुख्यालयातील पथकाने हवेत तीन फैरी झाडून तसेच शोकशस्त्र स्थितीत मान झुकवून वीर हुतात्म्यांना सलामी दिली.

◾हॉटस्प्रिंगच्या शौर्यगाथेला उजाळा

पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्मृतिदिनाचे महत्त्व विशद करताना २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे चिनी सैनिकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या शौर्याची आठवण करून दिली. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभर पोलीस स्मृतिदिन पाळला जातो, असे त्यांनी सांगितले.

◾गतवर्षभरात देशातील १५४ पोलीस अधिकारी व अंमलदार हुतात्मा

१ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशभरातील १५४ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागाला पोलीस दलाने नतमस्तक होऊन अभिवादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार अविनाश शिंदे यांनी केले. पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी, विविध शाखांचे प्रमुख आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे