Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बालकांच्या सुरक्षेसाठी तुळजापूर पोलिसांची विशेष मोहीम!

बाल सहाय्यक पोलीस पथकाची स्थापना; संजयकुमार बोंदर आणि ॲड. स्वाती शिंदे-जोगडे यांची सदस्यपदी निवड

0 8 5 6 2 6

बालकांच्या सुरक्षेसाठी तुळजापूर पोलिसांची विशेष मोहीम!

बाल सहाय्यक पोलीस पथकाची स्थापना; संजयकुमार बोंदर आणि ॲड. स्वाती शिंदे-जोगडे यांची सदस्यपदी निवड

तुळजापूर | तुळजापूर नामा

बालकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तुळजापूर पोलीस ठाण्यात विशेष बाल सहाय्यक पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. बालकांशी संबंधित तक्रारी, समस्या आणि त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशीलपणे काम करण्यासाठी या पथकाची रचना करण्यात आली असून, संजयकुमार बोंदर आणि ॲड. स्वाती शिंदे-जोगडे यांची विशेष बाल सहाय्यक पोलीस पथकाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी ही निवड केली आहे. बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका केवळ कायदेशीर कारवाईपुरती मर्यादित न राहता बालकांना विश्वासाचे आणि सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

◾बालस्नेही पद्धतीने कामकाज

विशेष बाल सहाय्यक पोलीस पथकाची रचना बालस्नेही आणि सक्षम पद्धतीने काम करण्यासाठी करण्यात येते. प्रत्येक पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची ‘बाल कल्याण पोलीस अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली जाते.

तसेच या पथकात सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असणे आवश्यक असून, त्यामध्ये किमान एक पुरुष आणि एक महिला सामाजिक कार्यकर्ता असणे अपेक्षित आहे. त्यानुसार तुळजापूर पोलीस ठाण्याने संजयकुमार बोंदर आणि ॲड. स्वाती शिंदे-जोगडे यांची सदस्य म्हणून निवड केली आहे.

◾बालकांच्या हक्कांच्या संरक्षणावर भर

बालकांवरील अत्याचार, दुर्लक्ष, शोषण किंवा इतर अडचणींच्या प्रसंगी संवेदनशीलपणे हस्तक्षेप करणे, बालकांना आवश्यक मदत मिळवून देणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे, ही या पथकाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

बालकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून त्यांना कायदेशीर तसेच आवश्यक सामाजिक आधार मिळवून देण्यासाठी हे पथक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे तुळजापूर शहर व परिसरातील बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पथकाची स्थापना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे