Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र गोविंद तामोरे यांना पदोन्नतीचा बहुमान

निवडश्रेणी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून सिंधुदुर्ग येथे बदली; तुळजापूरच्या विकासकामांतील योगदानाची सर्वत्र चर्चा

0 8 5 6 2 6

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र गोविंद तामोरे यांना पदोन्नतीचा बहुमान

निवडश्रेणी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून सिंधुदुर्ग येथे बदली; तुळजापूरच्या विकासकामांतील योगदानाची सर्वत्र चर्चा

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी उपेंद्र गोविंद तामोरे यांची निवडश्रेणी अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली असून, त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे प्रशासनातील त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.

तुळजापूर येथे कार्यरत असताना उपेंद्र गोविंद तामोरे यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील विविध विकासकामे, भाविकांसाठीच्या सुविधा, मंदिर परिसरातील नियोजन आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकास प्रकल्पांना गती देत त्यांनी भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

प्रशासकीय निर्णयक्षमता, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे उपेंद्र तामोरे यांनी अल्पावधीतच स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या पदोन्नतीमुळे तुळजापूरसह धाराशिव जिल्ह्यातील विविध सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून, पुढील जबाबदारीतही ते उल्लेखनीय कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सिंधुदुर्ग येथे जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून ते लवकरच पदभार स्वीकारणार असून, त्यांच्या नवीन प्रशासकीय वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे