Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

गायींच्या वासरांसह ४५ गोवंशीय जनावरांची दाटीवाटीने वाहतूक; भूम पोलिसांचा छापा! चारा-पाण्याविनाच कोंबले वाहनांत, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भुम पोलिस प्रशासनाची कारवाई

0 8 5 6 2 0

गायींच्या वासरांसह ४५ गोवंशीय जनावरांची दाटीवाटीने वाहतूक; भूम पोलिसांचा छापा! चारा-पाण्याविनाच कोंबले वाहनांत, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

तालुका प्रतिनिधी औदुंबर जाधव

भूम : तुळजापूरनामा

गोवंशीय जनावरांची चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना वाहनांत दाटीवाटीने कोंबून वाहतूक केल्याचा प्रकार भूम-पारडी रस्त्यावरील पांढरे देवी मंदिराजवळ उघडकीस आला. भूम पोलिसांनी गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३५ वाजण्याच्या सुमारास कारवाई करत ३५ जर्सी गायींची वासरे आणि १० जर्सी गायी, अशी एकूण ४५ जनावरे ताब्यात घेतली. या प्रकरणी अभिमान भगवान मंडलिक (वय ३२, रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि युसुफ सुदबुद्दीन सय्यद (वय २७, रा. खडकत, ता. आष्टी, जि. बीड) यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित जनावरांची आयशर वाहन क्रमांक एमएच २३ डब्ल्यू २६७० आणि पिकअप क्रमांक एमएच ०८ एच ७३३५ या वाहनांतून वाहतूक केली जात होती. जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था न करता त्यांना दाटीवाटीने भरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत जनावरांची किंमत सुमारे १ लाख ३५ हजार रुपये असून, वाहनांसह एकूण मुद्देमालाची किंमत ६ लाख ३५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भूम पोलिसांनी सरकारतर्फे दोघांविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(ड), ११(१)(ई), तसेच संबंधित गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीसंदर्भातील कलम ५(ब) व ९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. जनावरांची अशा प्रकारे दाटीवाटीने वाहतूक केल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा आणि कल्याणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे