Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शारदीय नवरात्रोत्सवाची आज दुसरी माळ; पहिल्या दिवशी गजराजाच्या वाहनातून छबिना मिरवणूक

आई तुळजाभवानीची नित्योपचार पूजा संपन्न!

0 8 5 6 2 0

आई तुळजाभवानीची नित्योपचार पूजा संपन्न!

शारदीय नवरात्रोत्सवाची आज दुसरी माळ; पहिल्या दिवशी गजराजाच्या वाहनातून छबिना मिरवणूक

तुळजापूर : तुळजापूर नामा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. आज, सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा विधिवत संपन्न झाली. नवरात्रोत्सवातील आज दुसरी माळ असून, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी, रविवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री श्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक गजराज अर्थात हत्तीच्या वाहनातून काढण्यात आली. या वेळी मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण होते.

या छबिना मिरवणुकीस नगराध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, नागेश शितोळे, अनुप ढमाले, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकारी, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी आणि भाविक उपस्थित होते.

आई तुळजाभवानीच्या जयघोषात शारदीय नवरात्रोत्सवाचा धार्मिक सोहळा सुरू असून, पुढील दिवसांतही विविध धार्मिक विधी आणि उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे