Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘उधारीच्या मटक्याने’ संसार उद्ध्वस्त होण्याची भीती! तुळजापुरातील चौकाचौकात मटका-जुगारावर लगाम घाला; एजंटांच्या कथित उधारी वसुलीवर कठोर कारवाईची मागणी

‘उधारीच्या मटक्याने’ संसार उद्ध्वस्त होण्याची भीती! तुळजापुरातील चौकाचौकात मटका-जुगारावर लगाम घाला; एजंटांच्या कथित उधारी वसुलीवर कठोर कारवाईची मागणी

0 8 5 6 2 6

‘उधारीच्या मटक्याने’ संसार उद्ध्वस्त होण्याची भीती!

तुळजापुरातील चौकाचौकात मटका-जुगारावर लगाम घाला; एजंटांच्या कथित उधारी वसुलीवर कठोर कारवाईची मागणी

तुळजापूर : प्रतिनिधी

तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील विविध चौक, बसस्थानक परिसरामागील सुलभ शौचालयाजवळ तसेच अडगळीच्या ठिकाणी सुरू असल्याचा आरोप असलेल्या मटका-जुगाराच्या उधारीच्या व्यवहारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मटका एजंटांकडून उधारी देऊन त्यावर चक्रवाढ पद्धतीने वसुली केली जात असल्याचा दावा करत या प्रकाराला तातडीने आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत रविंद्र ज्ञानोबा साळुंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन शहरातील मटका-जुगार व्यावसायिक, बुक्की मालक व एजंट यांना उधारीवर मटका घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत पोलिस प्रशासनाने सक्त निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

निवेदनानुसार, काही नागरिकांवर मटक्याची मोठ्या प्रमाणात उधारी झाल्यानंतर त्यावर कथितपणे अतिरिक्त व्याजाचा बोजा टाकण्यात येतो. वसुलीसाठी संबंधितांच्या घरी जाऊन कुटुंबीयांसमोर दबाव व दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक विवंचनेत काही महिलांना दागिने विकून कर्ज फेडण्याची वेळ आली असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

◾‘मटका बंद करा, उधारीची वसुली थांबवा!’

दि. १३ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊनही कथित उधारी वसुली सुरूच असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे शहरातील मटका-जुगाराच्या अवैध व्यवहारांवर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात तुळजापूर पोलीस ठाण्यातील काही पोलिस कर्मचारीही उधारीवर मटका खेळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

◾मुख्यमंत्र्यांकडे उधारी माफीची मागणी

मटका-जुगाराच्या कथित उधारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा आणि मटका एजंटांकडील नागरिकांची उधारी माफ करण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

मटका-जुगारामुळे कुटुंबांची आर्थिक वाताहत होत असल्यास प्रशासनाने केवळ कारवाईचे कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष मैदानात उतरून अवैध अड्डे, आर्थिक व्यवहार आणि कथित वसुलीची साखळी तपासावी, अशी मागणी रविंद्र साळुंके यांच्यासह नागरिकांमधून होत आहे.

3/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे