Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बलात्कार व ॲट्रॉसिटीच्या गंभीर गुन्ह्यात माजी सैनिकाला १० दिवसांत जामीन! धाराशिव विशेष न्यायालयाचा आदेश; ॲड. एम. बी. माढेकर यांच्या युक्तिवादात मांडले महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे!

ॲड. एम. बी. माढेकर यांच्या युक्तिवादात मांडले महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे!

0 8 5 6 2 0

बलात्कार व ॲट्रॉसिटीच्या गंभीर गुन्ह्यात माजी सैनिकाला १० दिवसांत जामीन! धाराशिव विशेष न्यायालयाचा आदेश; ॲड. एम. बी. माढेकर यांच्या युक्तिवादात मांडले महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे!

तुळजापूरनामा : धाराशिव

बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या ६५ वर्षांवरील माजी सैनिकाला अवघ्या दहा दिवसांत नियमित जामीन मंजूर झाला आहे. धाराशिव येथील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी हा आदेश दिला. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. एम. बी. माढेकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेची कलमे ६४(१), ६९, ११५(२), ३५१(२), ३५१(३) तसेच ॲट्रॉसिटी कायद्याची कलमे ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii) व ३(२)(va) अंतर्गत गुन्हा दाखल होता. आरोपीला १४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. १७ ऑक्टोबरला जामिनासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर २७ ऑक्टोबरला न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अर्ज मंजूर केला.

बचाव पक्षाने यापूर्वी फिर्यादी व तिच्या निकटवर्तीयांकडून विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारी, त्यातील कथनांमधील साम्य आणि संबंधित व्यक्तींचे परस्पर संबंध याबाबत कागदपत्रांसह मुद्दे मांडले. ॲट्रॉसिटी कायद्याचा कथित गैरवापर करून व्यक्तींना गुन्ह्यांत गोवण्याचे रॅकेट सक्रिय असल्याचा दावाही बचाव पक्षाने न्यायालयासमोर केला. याशिवाय एफआयआर दाखल करण्यास झालेला एक दिवसाचा विलंब, पुढील पोलीस कोठडीतील तपासाची आवश्यकता नसणे, आरोपीचे वय, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे आणि आरोग्यविषयक अडचणी हे मुद्देही मांडण्यात आले.

न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि प्रकरणातील परिस्थिती विचारात घेत नियमित जामीन अर्ज क्रमांक ४४४/२०२६ मंजूर केला. या आदेशामुळे माजी सैनिकाला दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲड. एम. बी. माढेकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. डी. ए. सरडे, संकेत भोसले आणि स्वप्निल बोबडे यांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे