ब्रेकिंगमहाराष्ट्र
चेक बाऊन्स प्रकरणातील दोषी आरोपीला अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी
एन.आय. ॲक्ट कलम १३८ अंतर्गत प्रकरण; येरवडा कारागृहात पाठविण्याचे न्यायालयाचे आदेश
0
8
5
6
2
6
चेक बाऊन्स प्रकरणातील दोषी आरोपीला अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी
एन.आय. ॲक्ट कलम १३८ अंतर्गत प्रकरण; येरवडा कारागृहात पाठविण्याचे न्यायालयाचे आदेश
पुणे : प्रतिनिधी
धनादेश अनादर अर्थात‘चेक बाऊन्स’ प्रकरणात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरलेल्या आरोपीस आंबेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार, आरोपी अभिजीत मुरलीधर बोरकर यास मे. जेएमएफसी न्यायालयाने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात आरोपीने मे. सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.
मात्र, अपील प्रलंबित असताना शिक्षेला स्थगिती मिळविणे आवश्यक असल्याने त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे समोर आले. त्यानंतर ४ एप्रिल २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीविरुद्ध Conviction Warrant जारी केल्याची माहिती देण्यात आली.
यानंतर आरोपीचा शोध सुरू असताना आंबेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आणि त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

◾न्यायालयीन प्रक्रियेत फिर्यादीची बाजू
सदर प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ॲड. जे. एन. पाटील यांनी बाजू मांडत प्रकरणाचा पाठपुरावा केला.
दरम्यान, दोषसिद्धीनंतर जारी झालेल्या न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी होत आरोपीला कारागृहात पाठविण्यात आल्याने न्यायालयीन प्रक्रियेच्या पालनाचा संदेश या कारवाईतून अधोरेखित झाला आहे.

0
8
5
6
2
6



