Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मोबाईल शॉपी फोडणारे सोलापुरातून जेरबंद!

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा, सहा मोबाईलसह मुद्देमाल जप्त

0 8 5 6 2 0

मोबाईल शॉपी फोडणारे सोलापुरातून जेरबंद!

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा, सहा मोबाईलसह मुद्देमाल जप्त

धाराशिव | तुळजापूर नामा

मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींचा अखेर छडा लागला आहे. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सोलापूर येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, मुरूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सहा अँड्रॉइड मोबाईल, रोख रक्कम आणि आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

१५ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग काढण्यात आला. त्यानुसार साहिल सलीम जमादार (वय १९) आणि आकाश चंद्रकांत वाघमारे (वय २५), दोघेही रा. साठे पाटील वस्ती, जुना देवगाव नाका, सोलापूर, यांना ताब्यात घेण्यात आले.

मुरूममधील दोन घरफोड्या उघड

पोलिसांनी केलेल्या तपासात मुरूम पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०२६ आणि १९१/२०२६ यांचा समावेश आहे. या प्रकरणांत आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्याबाबत पुढील तपास सुरू आहे.

ताब्यात घेतलेल्या दोघांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक अहवालासह त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुरूम पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण आणि चालक पोलीस हवालदार रत्नदीप डोंगरे यांनी ही कारवाई केली.

तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने दोन घरफोड्यांचा छडा लागल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाला यश मिळाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास मुरूम पोलीस करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे