Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पुन्हा एकदा धाराशिव जिल्हाप्रमुख पदाची धुरा मोहन पनुरे यांच्याकडेच?; जिल्हाभरात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू, संघटन उभारणीत मोठे योगदान; मोहन पनुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

0 8 5 6 2 6

पुन्हा एकदा धाराशिव जिल्हाप्रमुख पदाची धुरा मोहन पनुरे यांच्याकडेच?; जिल्हाभरात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू, संघटन उभारणीत मोठे योगदान; मोहन पनुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

धाराशिव : शिवसेनेच्या धाराशिव जिल्हाप्रमुख पदाबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला असून, विद्यमान जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हाभरातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, संघटनात्मक कामगिरी आणि पक्षनिष्ठेच्या बळावर त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोहन पनुरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेची शाखा उभारण्यापासून पक्ष संघटना मजबूत करण्यापर्यंत त्यांनी सातत्याने काम केले आहे. तब्बल २२ वर्षे तालुकाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागात शिवसेनेची भक्कम पायाभरणी केली.

यानंतर चार वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विविध निवडणुकांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे शिवसैनिक सांगतात.

मोहन पनुरे हे सलग चार वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून कुटुंबातील सदस्य निवडून आणले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचे नेतृत्व प्रभावी मानले जाते. तसेच जेवळी ग्रामपंचायतीवर सलग चार वेळा सत्ता मिळवून देण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.

याशिवाय, लोहारा नगरपंचायतीवर प्रथमच भगवा फडकविण्याचा मान त्यांच्या नेतृत्वाला मिळाला. या विजयामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बळाची प्रचिती आल्याचे पक्षातील नेत्यांचे मत आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुखपदासाठी पुन्हा एकदा मोहन पनुरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षश्रेष्ठी कोणावर अंतिम शिक्कामोर्तब करणार याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी पक्षाच्या अंतर्गत चर्चांमध्ये मोहन पनुरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे